विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

जामनेर : शहरातील गारखेडा रोडवरील सुशीला गॅस एजन्सीच्या कंपाउंडमध्ये उभ्या असलेल्या वाहनातून तब्बल दहा गॅस सिलिंडर चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या सिलिंडरची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सुशीला गॅस एजन्सीकडून दररोज सकाळी सिलिंडर वितरणासाठी वाहने रवाना केली जातात. दिवसभर सिलिंडर वाटप केल्यानंतर रात्री वाहन एजन्सीच्या आवारात उभे करण्यात येते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वाहनातून दहा गॅस सिलिंडर लंपास केल्याचे समोर आले.

एजन्सीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, सुरक्षेसाठी एक कुत्राही ठेवण्यात आला आहे. मात्र, चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या नजरेतून वाचेल अशा ठिकाणाची पाहणी करून लगतच्या शेतातून येत चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक स्वप्नील कस्तुरे यांनी जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जामनेर पोलिस करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!