प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.

कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष तथा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार रामदास तडस यांची ऑमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी रामदास तडस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीमुळे कबड्डी क्षेत्रासह महाराष्ट्रातील तैलिक समाजातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव भूषण कर्डिले, प्रदेश सहसचिव सुनील चौधरी, प्रदेश कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे, सेवा आघाडी अध्यक्ष मोहन चौधरी, शिरपूर तेली समाज पंच मंडळाचे सचिव जगदीश चौधरी, कोषाध्यक्ष ईश्वर चौधरी यांच्यासह महासभेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली कबड्डी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तसेच खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!