जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

अमर संस्था, चोपडा संचलित बालमोहन विद्यालयात लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आयोजित विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

या निवडणुकीसाठी बालमोहन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक गोपाल पाटील, स्वप्नील कुमार धनगर, शीतल चित्रकथी व भावना रजाळे यांनी अथक परिश्रम घेतले. सुरुवातीला चार उमेदवार रिंगणात होते. तथापि, एका उमेदवाराने आदल्या दिवशी माघार घेत दुसऱ्या विद्यार्थी प्रतिनिधीला पाठिंबा जाहीर केल्याने तिहेरी लढत झाली.

मतदान प्रक्रियेदरम्यान अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी तसेच संस्थेचे हितचिंतक सुधीर चौधरी व प्रीती सरवैय्या यांनी शाळेला भेट दिली. संपूर्ण शाळेत मतदान प्रक्रिया राबविल्यामुळे परिसरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

ही निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही संस्कार रुजविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!