कोंकण विभागीय प्रतिनिधी, विनोद हळदे.

मुंबई : श्रावण महोत्सवानिमित्त सावली सहयोग संस्थेच्या वतीने लोकमान्य नगर, प्रभादेवी येथील नालंदा बुद्ध विहार संघ येथे तातडीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झालेल्या या बैठकीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीचे औचित्य साधून श्रीमती श्रुती घाटगे (कांबळे) यांच्या वडिलांचे, स्वर्गीय धम्मानंद घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

यानंतर बैठकीस उपस्थित गरजू दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या विशेष भेटीमुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी श्रीमती श्रुती ताई घाटगे यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती सुहासिनी कांबळे ताई तसेच घाटगे परिवारातील सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. गरजू व वंचित घटकांसाठी भविष्यातही अशाच प्रकारे सहकार्य आणि सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!