जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी शासन निर्देशित “आनंददायी शनिवार ” या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावे, विविध सण व उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जोपासना व्हावी.

तसेच विद्यार्थ्यांमध्ये कृती कौशल्ये, नवनिर्मिती, देशप्रेम इ. गुण विकसित व्हावे या उद्देशाने तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून घरातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी “आकर्षक राखी बनविणे ” या उपक्रमात सहभाग घेऊन घरातील वस्तू तांदूळ, डाळ, पिस्ता साल, कागद, रंगीत दोरा, स्पंज, लोकर, रंगीत फुले, टिकली, मणी, कुंदन लेस आदी साहित्याचा उपयोग करून मनमोहक राख्या तयार केल्या.

त्यांना शाळेतील शिक्षिका सौ.नीलिमा सपकाळे, सौ. सुवर्णा वंजारी, सौ.मंगला भारुळे, श्रीमती योगिता महाजन, सौ.रुपाली महाजन, सौ.योगिता तडवी, सौ.वृषाली पाटील, श्रीमती संपदा तुंबळे, सौ.जयश्री नेहेते, तसेच शिक्षक श्री.हिम्मत काळे, श्री.आनंद पाटील, श्री.उमेश ढाकणे, श्री.जावेद पटेल, श्री.बापू पाटील यांनी मार्गदर्शन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ रमा तारे, श्री.जगदीश साळुंखे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

