राहुरी प्रतिनिधी, शरद खांदे.

राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचविहिरे येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिर परिसरात यंदाही भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट ते शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

प्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हे या सप्ताहाचे प्रमुख आकर्षण असून, दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काकडा भजन, विष्णुसहस्रनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन तसेच इतर भक्तिमय कार्यक्रमांमुळे संपूर्ण चिंचविहिरे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.

सप्ताहाची सुरुवात वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य प्रविण नवले (कणगर) यांच्या मंत्रोच्चाराने श्रीलक्ष्मीनारायणाचा अभिषेक करून करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान विविध संत-महंत व कीर्तनकारांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे.

या कार्यक्रमात ह.भ.प. संजय महाराज शेटे, ह.भ.प. सौ. योगिताताई शेळके, ह.भ.प. सौ. चैतालीताई जाधव, साध्वी गीतानंद सरस्वती, ह.भ.प. नवनाथ महाराज गिते, ह.भ.प. नंदकिशोर महाराज देवकर, ह.भ.प. सुभाषकर महाराज वाघ तसेच श्रीगुरु ह.भ.प. रामजी महाराज पवळ आदींची उपस्थिती व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहाच्या समारोपानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम, तर शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या सप्ताहासाठी महिला बचत गट, तरुण मंडळे, स्वामी समर्थ सेवा मंडळ, दूध संकलन केंद्र व दूध उत्पादक, विविध भजनी मंडळे, वादक, गायक-गायिका तसेच परिसरातील भाविकांचे सहकार्य लाभणार आहे.

श्रीक्षेत्र चिंचविहिरे येथे होणाऱ्या या ज्ञानयज्ञात परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!