जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार.

जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडनगरी, ता. जि. जळगाव येथील नव्याने सुरू झालेल्या ‘लविश टेन्ट हाऊस’ने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. गणपती मूर्ती विक्रीच्या दुकानांसाठी मजबूत वॉटरप्रूफ मंडप, गणपती बाप्पासाठी आकर्षक स्टेज व मखर तसेच घरगुती गणपती सजावटीसाठी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ग्राहकांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्या बजेटचा विचार करून मंडप, स्टेज, मखर आणि आकर्षक डेकोरेशन करून दिले जाणार आहे. जळगाव शहरातील रिंग रोड, टॉवर चौक, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक आणि गुजरात पेट्रोल पंप परिसर या भागांतील ऑर्डर्सना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे संचालकांनी सांगितले.

गणेशोत्सवाबरोबरच लग्न समारंभ, वाढदिवस, पार्टी आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी मंडप, टेन्ट, स्टेज, भांडी, खुर्च्या, लाईट, साऊंड आणि डेकोरेशनचे साहित्यही परवडणाऱ्या दरात भाड्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘लविश टेन्ट हाऊस’चे संचालक गोरख गायकवाड म्हणाले, “यंदा आमचा पहिला फोकस गणेशोत्सवावर आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार वेळेत आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि दर्जेदार सजावटीसोबतच मजबूत वॉटरप्रूफ मंडपाची गरज असलेल्या ग्राहकांनी लविश टेन्ट हाऊस, वडनगरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : गोरख गायकवाड – 9325728118 / 9545167740

पत्ता : लविश टेन्ट हाऊस, वडनगरी, ता. जि. जळगाव

Instagram : @lavish_eventmanegment

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!