जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

रावेर : महावितरणच्या पायाभूत आराखड्यांतर्गत AIIB प्रणाली बळकटीकरण योजनेत रावेर लोकसभा मतदारसंघातील भुसावळ तालुक्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. हतनूर व कु-हा उपकेंद्र (१×५ MVA) यांच्या उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.

या उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयजी सावकारे यांच्या शुभहस्ते नवनिर्मित उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

या नवीन उपकेंद्रामुळे हतनूर, कु-हा तसेच परिसरातील गावांच्या वीज वितरण व्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. वीजपुरवठ्यातील अडचणी कमी होऊन वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

नवीन उपकेंद्रामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच विविध व्यावसायिकांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा असून, या प्रकल्पामुळे स्थानिक वीज वितरण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!