जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
चोपडा शहरातील मुख्य रस्ता — उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) ते बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत — सिंगल लेअर सेमी ट्रिमिक्स काँक्रीटीकरणाच्या कामास आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या पुढाकाराने अधिकृतरीत्या सुरुवात झाली आहे.

हे काम आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आले असून त्यासाठी **१५०.०० लाख रुपये (एक कोटी पन्नास लाख रुपये)** मंजूर करण्यात आले होते. नागरिकांनी अनेक वर्षांपासून व्यक्त केलेली ही रास्त मागणी आता प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याबद्दल आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले.

आज आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी या रस्त्यावरील सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान कामाच्या गतीबाबत काही त्रुटी निदर्शनास आल्या. याबाबत बोलताना आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे म्हणाले, “नागरिकांना चांगले रस्ते आणि मूलभूत सुविधा वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कामात होणारी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.”

पाहणीदरम्यान संबंधित पीडब्ल्यूडी अधिकारी उपस्थित असल्याने आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. संबंधित यंत्रणा व कंत्राटदारांना समन्वय साधून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे पुढे म्हणाले, “चोपडेकरांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक विकासकामावर माझे बारकाईने लक्ष असून कामाच्या गुणवत्तेशी आणि गतीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विकासकामे वेळेत व दर्जेदार व्हावीत, याबाबत मी पूर्णपणे दक्ष आहे.”

या पाहणीदरम्यान शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
