जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
आडगाव : आडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन श्याम बाप्पू यांच्या पत्नी तसेच माजी सरपंच रावसाहेब पाटील यांच्या काकू ज्योतीताई यांच्या नावाने जळगाव जिल्हा बँकेत ठराव मंजूर झाल्याबद्दल आडगाव येथे त्यांचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्योतीताई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्यास माजी सरपंच पंडित रामदास पाटील, माजी सरपंच ताराचंद तुकाराम पाटील, पोलीस पाटील संगीता गोविंद पाटील, सुलोचना ताराचंद पाटील, वंदना रघुनाथ पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्रीराम देवचंद पाटील, माजी व्हाइस चेअरमन अंबादास नारायण पाटील, गोपाल रमण पाटील, ज्ञानेश्वर शिवराम पाटील, ज्येष्ठ नेते मंगल वासुदेव पाटील, सोसायटी संचालक भोमा जयसिंग पाटील, राजेंद्र ओंकार पाटील, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र अमृत पाटील, प्रवीण तुळशीराम पाटील, नवल छन्नू पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर देवराम पाटील, मंगल हिरामण पाटील, सुरेश जानकीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच आडगाव ग्रामस्थ शिवाजी लक्ष्मण पाटील, मच्छिंद्र आत्माराम पाटील, अशोक नामदेव पाटील, भगवान विठ्ठल पाटील, डॉ. विजय पाटील, रघुनाथ गिरधर पाटील, भूरशींग एकनाथ बाविस्कर, गोविंदा गोकुळ पाटील, जीवन धनसिंग पाटील, मनोज श्रीराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्योतीताई यांच्या नावाने जिल्हा बँकेत झालेला ठराव हा त्यांच्या कार्याची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. सत्कार सोहळ्यामुळे आडगावमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

