जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

आज दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी अडावद पोलीस स्टेशन येथे आगामी काळात साजरे होणाऱ्या सण व उत्सवांच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

सदर बैठकीस श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. बैठकीस मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा भाग, चोपडा हे विशेष उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी सण व उत्सवांच्या कालावधीत सामाजिक सलोखा व शांतता अबाधित ठेवण्याबाबत, अफवा अथवा गैरसमज पसरविणाऱ्या बाबींवर विश्वास न ठेवण्याबाबत, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत तसेच पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

सदर बैठकीस अंदाजे १७५ ते २०० सदस्य उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!