नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर.

नंदुरबार : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उत्तर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख म्हणून हिंदू सेवक श्री. केतन भैय्या रघुवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे मांडणे, समाजातील घटकांना संघटित करणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रदेश कार्यकारिणीतील ही जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

केतन भैय्या रघुवंशी हे सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवून काम करण्यासाठी परिचित आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख अशी जबाबदारी सोपवण्यात आली.

या नियुक्तीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात ओबीसी समाजातील विविध प्रश्न, संघटनात्मक उपक्रम आणि पक्षाच्या विचारांचा प्रसार यासाठी रघुवंशी यांच्या अनुभवाचा उपयोग होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून केतन भैय्या रघुवंशी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

“नवीन जबाबदारीच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रश्न, संघटन आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे मजबूत करण्यासाठी त्यांच्या कार्याला निश्चितच नवी दिशा मिळेल,” अशा भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहेत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!