जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व अंकज्ञानाला (FLN) बळकटी देण्यासाठी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध कृतीआधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी अक्षर ओळख, शब्द जुळवा, चित्रावरून गोष्ट सांगणे, वाचन-लेखन सराव यांसारखे भाषा विषयक उपक्रम घेण्यात आले. तसेच संख्या ओळख, मोजणी, संख्या जुळवा, सोपी बेरीज-वजाबाकी यांसारख्या कृती व खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंकज्ञान विकसित करण्यात आले.

शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्य (TLM) वापरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असून, खेळता-खेळता शिकण्यामुळे शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक झाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास व शिकण्याची गोडी वाढत असल्याचे दिसून आले. मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या सहकार्याने शिक्षकवर्गाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!