जळगांव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

जळगाव, रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात श्रीमती ए. व्ही. महाजन मॅडम यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या शौर्यगाथा, पराक्रम, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बाजीराव पेशवे यांच्या प्रेरणादायी कार्यातून विद्यार्थ्यांनी धैर्य, नेतृत्व आणि देशभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. एन. व्ही. चौधरी मॅडम यांनी केले.

यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री. वाय. जी. कट्यारमल सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, धैर्य आणि कर्तृत्वाचे स्मरण करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिष्ठा व नेतृत्वाची प्रेरणा घ्यावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!