जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील
चोपडा, भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) चोपडा पूर्व व पश्चिम तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदावर मा. रावसाहेब ताराचंद पाटील आणि मा. दत्तात्रेय रमेश पाटील (पिंटू भाऊ) यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्यातून हार्दिक अभिनंदन व्यक्त करण्यात आले आहे.

या निवडीबाबत चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. पक्षाने या दोन्ही युवक नेत्यांचे स्वागत करताना त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाला नवीन दिशा व गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

मा. रावसाहेब ताराचंद पाटील व मा. दत्तात्रेय रमेश पाटील (पिंटू भाऊ) यांनी यापूर्वीही पक्ष कार्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या निवडीमुळे चोपडा पूर्व व पश्चिम तालुक्यातील युवा संघटन मजबूत होईल आणि भाजपच्या युवक आघाडीच्या कार्यात नवीन ऊर्जा येईल, असे पक्ष कार्यकर्त्यांचे मत आहे.

भारतीय जनता पार्टी, चोपडा तालुकाने या निवडीबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, युवा शक्ती ही पक्षाची खरी ताकद आहे. मा. रावसाहेब पाटील व मा. पिंटू भाऊ यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा आणखी सक्रिय व प्रभावी बनेल.

या प्रसंगी पक्ष नेते, कार्यकर्ते व युवक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही नवीन तालुकाध्यक्षांचे अभिनंदन केले.
