जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

चोपडा, दि. १५ ऑगस्ट : चोपडा येथील अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात प. पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वरिष्ठ कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालमोहन वरिष्ठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष मनोज चित्रकथी, सचिव दीपक जोशी, ज्येष्ठ सदस्य डी. बी. पाटील, संस्थेचे हितचिंतक अशोक साळुंखे तसेच प्रा. डॉ. सुधीर चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. क्रीडा शिक्षक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कवायत घेण्यात आली, तर स्काउट-गाईड पथकाने ध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी थोर नेते व क्रांतिकारकांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली, तर माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी म्युझिक ड्रिलचे मनमोहक सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश्वर सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोईद सैय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!