जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील
दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ११० वी वार्षिक साधारण सभा बँकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आज संपन्न झाली. सभेचे अध्यक्षपद बँकेचे चेअरमन श्री. संजयजी मुरलीधर पवार यांनी भूषविले. सभेस संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभा अत्यंत उत्साहात व सुव्यवस्थित वातावरणात पार पडली.

या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित निकम यांचा बँकेच्या वतीने तसेच सर्व उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा सन्मान सहकार क्षेत्रातील सर्वांच्या विश्वासाची आणि स्नेहाची पावती असल्याचे निकम यांनी सांगितले. या मोलाच्या सन्मानाबद्दल त्यांनी सर्व सन्माननीय सभासद बंधू-भगिनी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
*रोहित निकम – पदभार*
• अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ
• सह-संयोजक, भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडी
• संचालक, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ
• अध्यक्ष, जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था
