कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर; पोलीस पाटील तसेच मंदिर-मस्जिद ध्वनिवर्धक परवानगीबाबत मार्गदर्शन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
अडावद, दि. १० ऑगस्ट २०२६ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आज अडावद पोलीस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सकाळी ११ ते १२.१० वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीला प्रशांत कंडारे साहेब यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीदरम्यान आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये पोलीस पाटील यांची भूमिका तसेच मंदिर आणि मस्जिदींमधील ध्वनिवर्धकांच्या परवानगीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सर्व सण-उत्सव शांतता, सलोखा व सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

यावेळी उपस्थितांनी विविध अडचणी व प्रश्न मांडले. त्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अडावद पोलीस ठाण्यात झालेली ही बैठक शांततेत व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
