जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील

जळगाव : अडावद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध देशी दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी शरद भागवत ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा, जि. जळगाव) याला अटक करण्यात आली असून एकूण ६५ हजार रुपयांचे कच्चे रसायन, भट्टीचे साहित्य आणि तयार दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक मा. सपोनि/सो प्रशांत कंडारे यांच्या आदेशानुसार अडावद पोलीस स्टेशनचे पोहेकॉ-१७८७ मधुकर नामदेव पवार (वय ३७) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी सकाळी ६.३० वाजता सुटकार गावालगत गावठाण भागातील एका खळ्यात धाड घातली. त्यावेळी आरोपी गा.ह.भ.ची दारू तयार करण्यासाठी गुळ, मोह व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन पाडत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत खालील माल जप्त करण्यात आला :

१. ६०,००० रुपये किमतीचे ५ प्लास्टिकचे २०० लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे ड्रम. प्रत्येक ड्रममध्ये गुळ व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन भरलेले होते.

२. ३,००० रुपये किमतीची दगड-लाकडी पेट्यांची चुल्हा व त्यावरील १०० लिटर क्षमतेची लोखंडी पत्र्याची टाकी. यात अंदाजे ५० लिटर उकळते रसायन (किंमत सुमारे ६० रुपये प्रति लिटर) तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे बागडी, मातीचे नंदाळे व प्लास्टिक नळी यांसारखे भट्टीचे साहित्य.

३.२,००० रुपये किमतीची २० लिटर तयार गावठी हात भट्टीची दारू (प्लास्टिक कॅनमध्ये, प्रति लिटर १०० रुपये दराने). एकूण जप्त मालाची किंमत ६५,००० रुपये आहे.

या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनमध्ये मुंबई प्रोहिबिशन अॅक्ट कलम ६५ (फ) (ब) (क) (ई) अंतर्गत गुन्हा क्रमांक १५४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ-३३५९ चंदुलाल सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कारवाई पथक :

पोहेका १७८६ मधुकर पवार, पोहेका ३११६ विनोद धनगर, पोका २००४ प्रदीप पाटील तसेच तपास अधिकारी पोहेका ३३५९ चंदुलाल सोनवणे.

 

अवैध दारू उत्पादनाविरोधात अडावद पोलीस स्टेशनने सतर्कतेने कारवाई केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या अवैध कारखान्यांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!