जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख.

अंतुर्ली : निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिकारी बिरसा मुंडा, क्रांतिकारी टंट्या भील तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी निर्वाणा फाउंडेशनचे अध्यक्ष व सचिव ॲड. प्रफुल किशोर मेढे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच आदिवासी समाजातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, अधिकार, शिक्षण आणि संविधानिक अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान राधा भिलाल, आरती बारेला, शिवा भिलाला, निलेश भिलाला, राज बारेला आणि गोपाल भिलाला या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय शिरतुरे, अजय मेढे, क्षितिज शिरतुरे, आर्यन मेढे आणि उदय मेढे यांनी विशेष सहकार्य केले.

“आदिवासी समाजाचा विकास, शिक्षणाचा प्रसार आणि हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणे, हा निर्वाणा फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा प्रयत्न आहे,” असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!