मुंबई, प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील, विशेष वृत्तांत :

केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमित शाह यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, फोर्ट, मुंबई येथे ‘सहकार नव-क्रांती’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ झाला.

नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचे सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सहकार क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित या महत्त्वपूर्ण सोहळ्यात सहकार क्षेत्रातील प्रमुख नेतृत्व व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या ऐतिहासिक प्रसंगी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मा. श्री. बाबासाहेब पाटील, मंत्री मा. श्री. जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे (NUCFDC) अध्यक्ष मा. श्री. ज्योतिंद्र मेहता, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उदय जोशी तसेच नॅशनल कंझ्युमर फेडरेशनचे (NCCF) अध्यक्ष मा. श्री. विशाल सिंह यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी रोहित निकम यांना मिळाली.

‘सहकार नव-क्रांती’ हा कार्यक्रम सहकारी बँकिंग क्षेत्राला नवीन दिशा देणारा आणि तंत्रज्ञान-आधारित, पारदर्शक व शाश्वत सहकार प्रणाली उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. — रोहित निकम.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!