जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ११:५० वाजेपर्यंत अडावद पोलीस स्टेशन हद्दीतील अडावद, कुंड्यापाणी, धानोरा प्र.अ., बिडगाव व मोहरद या गावातील मोहल्ला कमिटी सदस्य, मुस्लिम पंच कमिटी, मौलाना, प्रतिष्ठित नागरिक, तरुण व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत ईद-ए-मिलाद २०२६ सणानिमित्त विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीत ईद-ए-मिलाद २०२६ सणासंदर्भात मा. वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या गेल्या. संपूर्ण ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

सदर बैठक पूर्णपणे शांततेत व सुव्यवस्थितरित्या पार पडली. या बैठकीस सुमारे १३० ते १५० कार्यकर्ते उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!