पुणे प्रतिनिधी

पुण्यातील एका तरुणीची ओळख रोहित नावाच्या तरुणाशी झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. मात्र, रोहितने प्रेमाची मागणी केल्यानंतर तरुणीने त्याला नकार देत फक्त मित्र म्हणूनच पाहत असल्याचे सांगितल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, नकारानंतर रोहितने तरुणीचा छळ सुरू केला. तिची परवानगी नसताना आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ₹५० लाखांची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पैसे न मिळाल्याने आरोपीने संबंधित फोटो तरुणीच्या वडिलांना पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, आरोपीने तिला जबरदस्तीने गाडीत बसवून मंदिरात नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावल्याचा दावा केला. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, प्रकरणातील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!