जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
०२/०८/२०२६ रोजी विश्वकर्मा वंशीय समाज संघटने मार्फत नवनियुक्त पदाधिकारी यांना राज्य उपाध्यक्ष श्री भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले तसेच जळगांव जिल्हा कार्यकारिणी जळगांव शहर कार्यकारिणी युवा कार्यकारणी जाहीर करण्यात आली व मीटींग घेण्यात आली व मीटींग मध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जळगांव जिल्हा अध्यक्ष संजू सुर्यवंशी, विजय जाधव, संजय भालेराव, समाधान मेतकर, निलेश खैरनार, महेंद्र शिरसाट, गोपाळ मिस्त्री, कल्पेश खैरनार, सुरेश जाधव, प्रशांत जाधव, प्रशांत राऊत, राकेश गणूरकर, योगेश उरले, सतीश जाधव, गोपाल शार्दुल, चंद्रकांत वरणे, हर्षल दांडेकर, सागर जाधव, मनोज जाधव, संजय शिरसाट यांच्यासह समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त जिल्हा सचिवांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

