जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात आज सकाळी एक अमानुष आणि हृदयद्रावक घटना घडली. गावातील ५० वर्षीय सुभाष गोपाल भिलाला यांनी आपल्याच दोन लेकरांची झोपेत असताना धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे.

*मृतांची नावे*

– रामू सुभाष भिलाला (वय ११)

– मीरा सुभाष भिलाला (वय १३)

दोन्ही मुले झोपेत असतानाच हत्यारा बापाने त्यांच्यावर वार केले. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत खंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि सखोल चौकशी सुरू आहे.

हत्यारा बाप सुभाष गोपाल भिलाला गावाशेजारील शेतात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तिथेच शोधून ताब्यात घेतले असून सध्या तो अडावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे.

या अमानुष कृत्याला नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा इतर कोणतेही कारण असू शकते, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. चौकशी सुरू असल्याने अधिकृत कारण नंतर समोर येईल.

वडती गावात या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. दोन्ही लहान मुलांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले असून गावकरी हळहळत आहेत.

पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!