जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १०६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे, सौ रमा तारे, जेष्ठ शिक्षिका सौ.पद्मजा जोशी, श्री.आनंद चौधरी, श्री.जगदीश साळुंखे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता, लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रोहिणी प्रचंड मॅडम यांनी केले.

या वेळेस शालेय विद्यार्थी विवेक रमण रायगुडे, यशराज महेंद्र शिंपी, शेजल किशोर नारखेडे, परेश गढे, निकेतन सतीश लोहार, गौरव गिरीश देशमुख, जय किरण महाजन, हार्दिक किरण ठाकरे, खुशाल गजानन पाटील, हिमांशु निलेश चौधरी, वीणा सचिन जोशी, श्रद्धा शरद कंखरे, निशा राम शिंदे, काव्य संदीप राठोड, दूर्वा अविनाश बाविस्कर, कृष्णा हेमंत नेरकर, कुणाल गणेश साबळे, कामिनी शिंपी यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनकार्यावर मराठी व इंग्रजीतून भाषणे सादर केली. श्री. सोमनाथ महाजन सर यांनी कृतीयुक्त गीत तर श्रीमती संपदा छापेकर मॅडम यांनी लोकमान्य टिळकांवर प्रेरणादायी गीत सादर केले.

शाळेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे सर व सौ. मंगला भारुडे मॅडम तसेच श्री योगेश सोनजे सर यांनी मनोगत व्यक्त करून अण्णा भाऊ साठे यांच्या समता, न्याय, बंधुता विचारांचा व टिळकांच्या राष्ट्रभक्ती, स्वाभिमान या गुणांचा गौरव केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा पवार मॅडम यांनी केले, तर आभार श्री. आनंदा चौधरी सर यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!