जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरुण (प्रतिनिधी): हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ अंतर्गत येत्या १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पर्यावरण विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, स्वच्छता, जैवविविधता संवर्धन आणि हरित भविष्य यांसारख्या विषयांवर आकर्षक व कल्पक चित्रे साकारली. विद्यार्थ्यांच्या रंगरेषांमधून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत निसर्गाविषयीची जागरूकता आणि सर्जनशीलता दिसून आली.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थीदशेतच पर्यावरणप्रेमाचे संस्कार रुजविणे हा असून, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सृजनशील विचारसरणी विकसित होत असल्याचे सांगितले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

चित्रकला स्पर्धेमुळे विद्यालय परिसरात हरित विचारांचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ मध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!