‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोनसह मोबाईल व दुचाकी जप्त

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील :

अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे बाजार महा मंडळ, सेक्टर ए-१४ परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ आढळून आला.

या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी, एक मोबाईल फोन आणि हिरो होंडा स्प्लेंडर (MH-17-DL-4598) अशी एकूण ३.५८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!