जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

“विद्यार्थांनी अभ्यासाबरोबरच निरोगी आरोग्य व खेळ या कडे लक्ष देऊन चांगले नागरिक बनावे!”- डॉ.श्री.गिरीश सहस्त्रबुद्धे “

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शालांत पारितोषिक व सन्मान पदक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरवातीस शालेय विद्यार्थिनींनी “स्वागत गीत”सादर केले. त्यास संगीत शिक्षिका संपदा तुंबळे व श्री.उल्हास ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

या वेळेस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.गिरीश सहस्रबुद्धे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशीलदादा अत्रे, विश्वस्त श्री.प्रेमचंद ओसवाल, सचिव श्री अभिजीत देशपांडे, ज्येष्ठ संचालक प्रा.शरच्चंद्र छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे यांनी तर अहवाल वाचन मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे यांनी करून शाळेतील उल्लेखनीय उपक्रमाचा आढावा सादर केला.तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ. रमा तारे यांनी करून दिला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशीलदादा अत्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सरस्वती देवतेची मूर्ती देऊन करण्यात आले. या वेळेस शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळातून प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी

१.साई तुषार पाटील (९५.३%),

२.दिशा वीरेंद्रकुमार चांडक(९६.४%),

३.नम्रता राजेश पाटील (संस्कृत प्रथम),

४.वरद नामदेव सूर्यवंशी(सामाजिक शास्त्र प्रथम),

५. टिशा प्रवीण नेहेते(९०.५%,इ.९ वी प्रथम),

६.दिशा भरत पाटील(९६.१७%),

७.खुशाली अतुल पाटील (९३%),

८.ललित योगेश घुगे(९५%),

९.अश्विनी विजय घुगे(९३.६%),

१०.केशव विनोद मराठे(९३.४%),

११. राहुल ज्ञानेश्वर बारसे(९२%)

या विद्यार्थांना सन्मानपदक ,भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरवांकित करण्यात आले. तसेच शालेय विषयांत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सन्मान रोख पारितोषिक, भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.या प्रसंगी शाळेतून प्रथम आलेला गुणवंत विद्यार्थी साई तुषार पाटील याने शाळेच्या व शिक्षकांच्या प्रती ऋण व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थांनी अभ्यासासोबत खेळ, व्यायाम, संतुलित आहार याकडे लक्ष देऊन सुदृढ व चांगला नागरिक होण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.श्री. सुशीलदादाअत्रे यांनी गुणवंत विद्यार्थांचे कौतुक करून मोबाईलपासून दूर राहून जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सन्माननीय संचालक ॲड.श्री.पंकजदादा अत्रे, श्री.सचिन दुनाखे,संस्थेच्या मुख्य समन्वयिका सौ.पद्मजा अत्रे, सहसचिव सौ.मिराताई गाडगीळ, समन्वयिका सौ.लताताई छापेकर, संस्था संचलित शाळांचे मुख्याध्यापक सौ.लीना कुलकर्णी, सौ. अर्पणा मुळे, श्री.जितेंद्र वानखेडे, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ रमा तारे,गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी देणगीदार सूचीचे वाचन सौ.स्मिता करे यांनी व सन्मान पदक व पारितोषिक यादीचे वाचन सौ.प्राजक्ता गोहिल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रेवती किन्हीकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.जगदीश साळुंखे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देणगीदार, पालक शिक्षक संघ, बक्षीस वितरण समिती प्रमुख श्री.जगदीश साळुंखे, सौ.स्मिता करे, सौ.प्राजक्ता गोहिल, श्री.आनंद पाटील, श्री.आनंद चौधरी, श्री.पंकज खंडाळे, श्री.पंकज महाले, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!