जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार.
वड्री धरण, निंबा देवी धरण व श्रीक्षेत्र मनूदेवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वड्री धरण व निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तसेच पावसामुळे मनू देवी धबधबा देखील प्रवाहित झाला असून परिसरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, धरण परिसर, धबधबा, नदी-नाले, पूल, पाण्याचा वेग असलेले प्रवाह तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते यांच्या जवळ जाणे अथवा अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी:
टोल फ्री: 1077
जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष:
0257-2217193 / 0257-2223180
WhatsApp हेल्पलाईन: 9373789064
