जळगांव जिल्हा प्रतिनिधी ,, निलेश खैरनार ,,
जळगांव जिल्ह्यातील अमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे बोरी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली असून शहरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुराच्या जोरदार प्रवाहात पाण्याचा टँकर वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे ,,,
