जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगांव शहरातील रामेश्वर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ नाल्यावर संरक्षक कठडा नसल्यामुळे एक व्यक्ती आणि एक लहान मुलगा या नाल्यात पडून अपघात झालेला आहे.

या अपघातात लहान मुलाला व त्याच्या सोबत असलेल्या गाडी चालक व्यक्ती यांना खूप मार लागलेला आहे, दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटल येथे हलविण्यात आलेले आहे. मात्र याठिकाणी रोजच अशा प्रकारचे अपघात घडत असतात, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

सदर रस्त्यावरून एम.आय.डी.सी. मध्ये कार्यरत असलेले कामगार, स्थानिक नागरिकत तसेच जवळच असलेल्या विद्या इंग्लिश मिडीयम शाळेच्या लहान मुलांचा येण्या जाण्याचा रस्ता असल्याने तिथं वर्दळ जास्त प्रमाणात असते, सदर रस्त्यात खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत, काही दिवस आधी या रस्त्यावरील खड्डे हे शाळेत विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या रिक्षा चालकांनी बुजवले होते, याबद्दल आपण बातमी देखील प्रसारित केली होती.

या रस्त्यावरील नाल्यावर संरक्षक कठडा देखील नाही, या ठिकाणी रोज छोटे मोठे अपघात होत असतात, तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर प्रशासन या विषयाकडे लक्ष देणार आहे का? या विषयाची मनपा प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि तत्काळ उपाय योजना करून जनतेला सुविधा पुरवावी अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!