जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना शहरातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली व मोटारसायकल असा ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागात राहणारे राहुल किसनराव कदम यांनी तालुका जालना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ जुलैच्या सायंकाळपासून २० जुलैच्या सकाळदरम्यान गोल्डी लॉन्ससमोरील बांधकाम परिसरातून त्यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH20 AV9561) अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी तालुका

जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर आणि ६० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल असा ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!