मोठी बातमी …
दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) अखेर राजीनामा दिला आहे.

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती. याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र, २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी केली होती.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज (२५ जुलै) शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश
गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. आज (२५ जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.
