विभागीय प्रतिनिधी – महेशप्रसाद दिक्षित

जामनेर : लिटील फ्लॉवर्स इंग्लिश मेडिअम स्कूल, जामनेर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत दिंडी काढत जागो जागी रिंगण व नुत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमात जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र बाबुराव पाटील तसेच सचिव जितेंद्र रमेश पाटील यांनी गांधीचौकातील शिवस्मारकाजवळ भक्तीगीतावर पावली खेळून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली . मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना आमोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषा तसेच पारंपरिक दिंडीने कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित पालक, मान्यवर आणि नागरिकांनी शाळेचे अभिनंदन केले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!