अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर पोलिसाने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.
अकोला प्रतिनिधी.
• अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर पोलिसाकडून बलात्कार
• ज्या घरात भाड्याने राहत होता त्या घराच्या मालकाच्या मुलीसोबत भयंकर कृत्य
• आरोपी पोलिस सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

अकोल्यामध्ये पोलिसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार
केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा पोलिस ज्या
घरात भाड्याने राहत होता त्याच घरमालकाच्या मुलीसोबत त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतरचिंतेत आलेल्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या मुलीची प्रकृती गंभीर असून ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलिस घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांसह गावकऱ्यांचा पोलिस उपविभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ महाराष्ट्र पोलिसांच ब्रीदवाक्य याचाचं विसर पोलिसांना पडलाय. याची प्रचीती देणारी घटना अकोल्यातून समोर आली आहे. अकोल्यातल्या बाळापूरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलाय. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिचे प्राण वाचवत कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखले केले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती सध्या कोमात आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिस कर्मचारी फरार झालेला आहे. संबंधित पोलिस कर्मचारी याचे नाव पवन वडगावे असे असून, पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे बोलले जात आहे, या घटनेच्या निषेधार्थ पीडित मुलीचे नातेवाइकांसह गावकऱ्यांनी पोलिस उपविभागीय कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले, पवन वडगावे याला त्वरित अटक करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.
या प्रकरणात बाळापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आरोपी हा त्याच पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता. त्यामुळे तेथील पोलिसांनी पवन वडगावे याला पळून जाण्यास मदत केली असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलेलं आहे. दुसरी कडे सदर गुन्ह्याचा तपास हा स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ पातळीवर वर्ग करावा अशी मागणी ही होत आहे.
दरम्यान, तरुणीने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. आज पीडित तरुणी ही मृत्यूशी संघर्ष करत असून, अद्यापही आरोपी पोलिस कर्मचारी याला अटक होत नाही, त्यामुळे संबंधित स्थानिक पोलिस आणि आरोपी पोलिस कर्मचारी याला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे, या साठी शेकडो समाज बांधव आणि नातेवाईकांचा उपविभागीय पोलिस कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
