दिल्ली विद्यार्थी CJP आंदोलन विशेष

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक अभूतपूर्व घटना घडली आहे. उत्तराखंड पोलीस दलातील कॉन्स्टेबल शेर सिंह यांनी आंदोलनस्थळी येत आपला राजीनामा जाहीर केला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दर्शवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून देशभरात त्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेर सिंह यांनी जंतर-मंतरवरील मंचावर येऊन आपले राजीनामा पत्र CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी, “जर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभे राहणे बंड असेल, तर मी ते मान्य करतो,” अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यांनी उत्तराखंडसह देशभरात परीक्षा पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!