५०० विद्यार्थांनी साकार केल्या विविध वेशभूषा, पालखी पूजन, वारकरी दिंडी, रिंगण सोहळा, समूह नृत्य, गायन आदी उपक्रमांनी कार्यक्रमात आणली रंगत

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात आज शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थांना पंढरपूर वारीचे महत्व समजावे तसेच, संत परंपरा व त्यांचे सामाजिक कार्य समजून, भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, आध्यात्मिक व सामाजिक मूल्ये व मंगल भक्तिभावाची जोपासना व्हावी या हेतूने भव्य व शिस्तबद्ध वारकरी दिंडी, विठ्ठल रुख्मिणी पालखी पूजन रिंगण सोहळा, समूहनृत्य गायन यासारख्या भक्तीमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री.प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, सौ रमा तारे आदींच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी पालखीचे पूजन व हरिनामाचा सवाद्य गजर, टाळ मृदंगाच्या निनादात वारकरी दिंडीला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील साधारणता 500 विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माथी चंदनाचा टिळा,गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ, विविध वाद्य भगवी पताका असलेले ध्वज, पर्यावरण पूरक संदेश असलेले फलक, डोक्यावर तुळशी वृंदावन व विठ्ठल रुख्मिणी, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत नामदेव, संत ज्ञानदेव, तसेच वारकरी यांची वेशभूषा साकारून मोठ्या भक्ती भावाने भव्य दिंडीत सहभागी झाले होते. या वेळेस अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात सहभागी विद्यार्थांनी टाळ वाजवून हरिनामाचा गजर करीत पावली वर ठेका धरत शालेय परिसरात प्रत्यक्ष पंढरपूर वारीचं चित्र साकारले होते. या दिंडीत विद्यार्थांनी आपल्या टोपीवर “आम्ही वारकरी पंढरीचे” असे रंगवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शाळेतील गणवेशधारी विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

या प्रसंगी कुलदीप कुशवाह याने विठ्ठल व तर तृषा पाटील हिने रुख्मिणी ची वेशभूषा तर व कृष्णा पाटील, वीणा जोशी, श्रद्धा कंखरे, अर्णव मोरे यांनी विविध संतांची वेशभूषा साकारली होती. या भव्य व भक्तीमय, शिस्तबद्ध वारकरी दिंडीचा समारोप शालेय मैदानावर करण्यात येऊन तिथे संगीताच्या तालावर व विविध वाद्याच्या साथीने नेत्रदीपक रिंगण सोहळा साकारण्यात आला. तसेच या प्रसंगी विद्यार्थिनींनी गवळण, माऊली, माऊली व संतांच्या नावाचा जयघोष करीत फुगळी खेळून तसेच पंढरपूर वारी वर आधारित सुप्रसिद्ध आध्यात्मिक गीतावर सुंदर वेशभूषेसह समूह नृत्य व गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांनी आषाढी एकादशी व पंढरपूर वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्व सांगून सहभागी विद्यार्थांचे कौतुक केले. तसेच संताच्या जीवन कार्यातून समता, मानवता, बंधुता, स्वच्छता आदी गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी विद्यार्थांना गोड खाऊचे वाटप करून या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे, सौ. रमा तारे, सौ.मोहिनी कुलकर्णी, सौ. सुवर्णा वंजारी, सौ.रेखा पाटील, सौ.नीलिमा सपकाळे, श्री.उमेश ढाकणे, सौ.रुपाली महाजन, सौ.मंगला भारुळे, श्रीमती संपदा तुंबडे, सौ. वृषाली पाटील, श्रीमती योगिता महाजन, सौ.जयश्री नेहेते, सौ.योगिता तडवी, सौ.स्वाती एडके, श्री.हिम्मत काळे, श्री.अशोक पाटील, श्री.दिलीप गायकवाड श्री.बापू पाटील, श्री.आनंद पाटील, श्री.मयूर पाटील, श्री.गौरव देशमुख, श्री.जावेद पटेल, श्री.किशोर माळी, श्री. हितेंद्र जोशी, श्री.बापू सोनगीरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थांचे पालक यांनी परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!