प्रतिनिधी, शंकर कवाने. विशेष वृत्तांत
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात मॅडम व सौ.दमयंती कोळी मॅडम संचालक तथा रायगड जिल्हाध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22/07/2026 बुधवार रोजी कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय सोमटणे येथील विद्यार्थिना बाळ गुन्हेगारी व सायबर सिक्युरिटी बाबत माहिती मेळावा घेण्यात आला.

यावेळी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या संचालक व रायगड जिल्हाध्यक्षा सौ. दमयंती पांडुरंग कोळी मॅडम यांनी बाळ गुन्हेगारी, मुलींवर होण्याऱ्या अत्याचार संदर्भात मार्गदर्शन केले. संघटनेचे खालापूर तालुका सचिव श्री. विजय शिंदे सर यांनी सायबर गुन्हेगारी, चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098,सायबर हेल्पलाईन नंबर 1930 याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. दर्शना घरत मॅडम यांनी संघटनेच्या संचालक व जिल्हाध्यक्षा सौ. दमयंती पांडुरंग कोळी मॅडम यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री. रेवनाथ पाटील सर व कार्याध्यक्ष श्री. सुशांत पाटील सर यांनी केले.
