जळगाव : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण (ईडीपी) बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४ जुलै २०२६ ते ५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

प्रशिक्षक म्हणून गिरीष बी. टाकणे (ज. ज. स. बँक लि., जळगाव शाखा, चाळीसगाव कर्ज विभाग) बँक व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हितेश शिवाजी तलरेजा, चार्टर्ड अकाउंटंट, चाळीसगाव हे व्यवसाय उभारणी, आर्थिक नियोजन, बाजारपेठेतील संधी तसेच कौशल्य विकास याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे हे अमृतच्या विविध योजना व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती देणार असून कार्यक्रमास समीर भाटिया यांचे विशेष मार्गदर्शन व विनोद देशपांडे यांचे सहकार्य लाभणार आहे.

सदर ईडीपी बॅचमध्ये एकूण २० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून दि. ३० जुलै २०२६ पासून प्रशिक्षणास ऑनलाईन सुरुवात करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, डिजिटल व्यवहार, उद्योग व्यवस्थापन, ग्राहक व्यवस्थापन तसेच अमृतपेठ, अमृतपेठ ऑफलाइन, वैयक्तिक व्याज परतावा योजना, ड्रोन पायलट मिशन व विविध कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!