जळगाव–चोपडा–अडावद प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील.

शेवरे बु. येथे कारवाई; आरोपीला रंगेहाथ पकडले, १० हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव/चोपडा : जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिसांनी अवैध दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत चोपडा तालुक्यातील शेवरे बु. येथे एका संशयित आरोपीला रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी १४० लिटर नवसागर मिश्रित कच्चे रसायन आणि २०० लिटर क्षमतेचा ड्रम, असा एकूण सुमारे १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता शेवरे बु. गावाजवळील नाल्याकाठच्या झाडाझुडपांमध्ये अवैध दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अडावद पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी खुमसींग टेभ्या वारेला (वय ४२, रा. वरगव्हाण, शेवरे बु.) हा गूळ, मोहू व नवसागर मिश्रित कच्च्या रसायनाचा वापर करून अवैध दारू तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले.

या प्रकरणी अडावद पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत कडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्वर कलिंदर तडवी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तायडे यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्वर कलिंदर तडवी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे करीत आहेत.

दरम्यान, परिसरात अवैध दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!