जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरुण) :

शासनाच्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला मेहरुण परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अभियानाची सुरुवात २९ जूनपासून करण्यात आली आहे. आतापर्यंत १० शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, शेकडो नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या मतदार यादीसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या.

शिबिरांमध्ये नागरिकांना मतदार यादीसंबंधी आवश्यक माहिती देण्यात येत असून, अर्ज भरणे, कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर शंकांचे निरसन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अभियानाचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रभागातील घराघरांमध्ये जाऊन फॉर्मचे वितरण करत जनजागृती केली.

सध्या संत ज्ञानेश्वर चौक,मा. नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या घराजवळ एस.आय.आर. कॅम्प सुरू असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मतदार यादीसंदर्भातील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आजच या, आपले काम वेळेत पूर्ण करून घ्या. आपला एक छोटासा प्रयत्न, उद्याची मोठी अडचण टाळू शकतो.” असा संदेशही यावेळी देण्यात आला.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता एस.आय.आर. अभियान पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, अधिकाधिक पात्र नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!