जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
(मेहरुण) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा “टाकाऊपासून टिकाऊ” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वापरात नसलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून आकर्षक फुलांच्या कुंड्या तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगती, कलात्मक सजावट आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बाटल्यांना नवे रूप दिले. या उपक्रमातून पुनर्वापराचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाली.

हा उपक्रम उज्वला नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुनर्वापराची सवय अंगीकारावी, असे आवाहन केले. पर्यवेक्षिका शितल कोळी यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे शिक्षकांनीही कौतुक केले.
