जळगाव चोपडा अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.
३० हजार रुपयांचे ६०० लिटर रसायन जप्त; एक आरोपी रंगेहात अटक
अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत, आज दिनांक १९ जुलै २०२६ रोजी अडावद पोलिसांनी यशस्वी कारवाई केली. वडगाव खुर्द (ता. चोपडा) येथील गावठाण जागेवरील नाल्यात गावठी दारू तयार करण्याचे रसायन गाळत असलेल्या एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून ३०,००० रुपये किमतीचे ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले आहे.

घटनेची सविस्तर माहिती:
आज दुपारी सुमारे ३:०० वाजताच्या सुमारास अडावद पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय गुप्त माहितीवरून वडगाव खुर्द येथील गावठाण भागातील नाल्याजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी शत्रूघन आण्णा भिल (वय ३० वर्षे, रा. वडगाव खुर्द, ता. चोपडा) याला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन गाळताना पकडण्यात आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी प्रत्येकी १०,००० रुपये किमतीच्या तीन टाक्यांमधील एकूण ६०० लिटर रसायन (एकूण किंमत रु. ३०,०००/-) जप्त केले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदणीकृत गुन्हा क्रमांक गु.र. नं.: १४८/२०२६, कलम: महाराष्ट्र दारूबंदी कायदा (महाराष्ट्र प्रोहिबिशन) कलम ६५ (फ) सदरची कारवाई करण्यात आली.

कारवाई करणारे पथक:
पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात पो.हे.कॉ. ९४१ संजय धनगर, पो.हे.कॉ. ३११६ विनोद धनगर, पो.हे.कॉ. १७८७ मधुकर पवार पोलिसांनी ही कारवाई केली.
नागरिकांना आवाहन:
आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर गावठी दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्यास तात्काळ अडावद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
