जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव दिनांक १७/०७/२०२६ रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय येथे लकी भाऊ जाधव (राष्ट्रीय युवा अध्यक्ष ) व गणेश भाऊ गवळी ( युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र ) यांच्या मार्गदर्शना नुसार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे मा. अपर जिलाधिकारी श्रीमंत हारकर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

निवेदना मध्ये असे नमुद करण्यात आले की, महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा १७/०१/२०२२ च्या शासन निर्णया मध्ये असे म्हटले आहे की, आदिवासी विद्यार्थान कडून महाविद्यालयात प्रवेश घेतांना कोणत्याही प्रकारची प्रवेश शुल्क आकारू नये, तरी सुद्धा जळगाव जिल्हातील महाविद्यालय आदिवासी विद्यार्थान कडुन प्रवेश शुल्क घेत आहेत व यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणा पासून वंचीत राहत आहे, याची दखल शासनाने घ्यावी, जर उचित कार्यवाही नाही केली तर येणाऱ्या दिवसां मध्ये, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद चे जळगाव जिल्हा अध्यक्ष अलताफ तडवी व परिषदेचे पदाधिकारी रमजान तडवी, जहीर तडवी, समिर तडवी, मनोज तडवी, अकमल तडवी, हुसेन तडवी, साहिल तडवी, जुनेद तडवी, मोहित तडवी, वसीम तडवी, शुभम बारेला, रितेश बारेला, मोसीम तडवी आदि विद्यार्थी उपस्थित होते.
