जळगाव, चोपडा, अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील.

अडावद (जि. जळगाव) : अडावद पोलीस स्टेशनच्या पथकाने रात्रीच्या वेळी केलेल्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने दोन गायींना क्रूरतेने पायी चालवून नेणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ४५ हजार रुपयांच्या दोन गावठी गायी जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक १८ जुलै २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अडावद पोलीस पथकाने शेतकी शाळेच्या पाठीमागील कच्च्या रस्त्यावर सापळा रचला होता. या ठिकाणी कत्तलीच्या हेतूने गायी घेऊन जाणारे दोन बालके पोलिसांच्या हाती लागले. या कारवाई मध्ये जप्त मुद्देमाल रु. ४५,०००/- किमतीच्या दोन गावठी गायी जप्त करण्यात आलेल्या असून, गोवंशाला तात्काळ सुरक्षिततेसाठी कामधेनु गोशाळेत हलविण्यात आले आहे.

अडावद पोलीस स्टेशन येथे नोंद झालेला गुन्हा पुढील प्रमाणे आहे, रजि. नं. ०१४६/२०२६  नुसार लावलेली कलमे,

– प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(c)(d)

– महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५ए व ५बी

– भारतीय दंड संहिता कलम ११९

या कारवाईचे नेतृत्व सपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाठ (ब.नं. १०९) यांच्या पथकाने केले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया व तपास सुरू आहे.

अडावद परिसरात गोवंश हत्येच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेली ही तत्पर आणि प्रभावी कारवाई स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!