कोल्हापूर प्रतिनिधी,
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात यांच्या सुचनेनुसार कोल्हापूर जिल्हा आढावा बैठक दि १७/०७ /२६ रोजी विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत निकम व संचालक तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ शोभाताई खेडकर यांच्या शिफारशीनुसार घेण्यात आली.

या बैठकीत काही गैरसमज झाले होते ते प्रथम दुर करण्यात आले आणि येथुन पुढे सर्व जण एकत्रित समाजकार्य करतील अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा टिमने दिली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ शोभाताई खेडकर यांनी आपले जुने पदाधिकारी संग्राम पाटील यांना या बैठकीत निमंत्रित केले होते, या वेळी नुतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील यांनी सांगितले की, लवकरच कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करू व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. काही अपवाद वगळता आढावा बैठक झाली.

या प्रत्यक्ष बैठकीसाठी संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभले, तसेच यावेळी संचालक तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. शोभाताई खेडकर यांनी सांगितले की, मी संचालक या नात्याने संपुर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी देवू शकते याच निमित्ताने १० ऑगस्ट दरम्यान रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी देण्यात येईल तसेच ठाणे जिल्ह्यातील काही महत्त्वाचे पदाधिकारी नियुक्त केले जातील, या बैठकीत सरदेसाई सर, वैशाली कांबळे (कोल्हापूर) सुकुमार चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ. शोभाताई खेडकर यांची पोलीस मित्र ची टिम उपस्थित होती.
