जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
रामेश्वर कॉलनी परिसरातील अशोक चौक ते आदित्य हॉटेल चौक, स्वामी समर्थ चौक तसेच नमस्कार चौक ते मंगलपुरीपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळेस वाहने व अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर परिसरात शाळा असल्यामुळे विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. वाहनांच्या अतिवेगामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशोक चौक ते आदित्य हॉटेल चौक, स्वामी समर्थ चौक तसेच नमस्कार चौक ते मंगलपुरीपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत. तसेच वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि इतर आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना तात्काळ करण्यात यावे.
आपण या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे शहर अभियंता जळगाव मनपा यांना केली, या प्रसंगी हर्षल वाणी, संदीप मांडोळे, गणेश पाटील, अविनाश पाटील तसेच इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.
