जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी अडावद पोलिसांनी धानोरा गाव परिसरात विशेष गस्त व तपासणी मोहीम राबवली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान विनाकारण फिरणारे, शांततेचा भंग करणारे आणि संशयास्पद वर्तन करणारे तीन टवाळखोर रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, परिसरात छेडखानी व रोड रोमिओगिरी करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध अशीच कडक आणि सातत्यपूर्ण कारवाई यापुढेही करण्यात येईल.

सदरच्या कारवाईत सहभागी पोलिस पथक पुढील प्रमाणे आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे (प्रभारी अधिकारी), पीएसआय शरीफ तडवी, सचिन नागरे, जयदीप राजपूत, विशाल तायडे, महिला अंमलदार दिव्या मराठे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!