जळगांव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील.
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी!
गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांच्या खिशाला झळ! राज्यात एसटीच्या भाड्यात १३.५६% वाढ करण्यात आली असून हा नवा दर १७ जुलै २०२६ मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू झाला आहे.
वाढती डिझेलची किंमत, कर्मचाऱ्यांचे भत्ते, सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री यांचे म्हणणे आहे, तसेच आर्थिकदृष्ट्या एस टी महामंडळ सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही भाडेवाढ योग्य आहे, असे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मत आहे.
प्रत्येक्षात मात्र या मागेही एस टी महामंडळ तोट्यात होते, ते भरून काढण्यासाठी एसटीच्या दरात वाढ करण्यात आलेली होती. आजही भंगार परिस्थिती मध्ये असलेल्या एसटी बस रस्त्यावर धावत आहेत, त्यांच्या धुरामुळे, त्यामधून येणाऱ्या आवाजामुळे मुळे प्रवाश्यांना होणाऱ्या मनस्तापबद्दल मात्र कुणीच काही बोलत नाही, मग नेमका देखभाल खर्च जातो कुठे? दरवाढ लागू केली तशी भंगार बस आता तरी रस्त्यावरून बाजूला होणार का? आणि दरवाढ केल्या प्रमाणे आरामदाई प्रवास महाराष्ट्रातील जनतेला मिळणार का? असे बरेच प्रश्न सर्वसामान्य जनतेला आज ही पडलेला आहे, आणि तो अनुत्तरित आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी दळणवळणाचा सर्वात मोठा आणि सुरक्षित आधार हा एस. टी. आहे, आणि सध्याच्या वाढत्या महागाईत येणाऱ्या सणासुदीच्या काळातच एस. टी. ची ही दर वाढ परवडणारी नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून एक नाराजीचा सूर उमटून येत आहे.
